नुसती लुटालूट, ऑनलाईन बाजारात मास्कची चढ्या दरानेच विक्री

नुसती लुटालूट, ऑनलाईन बाजारात मास्कची चढ्या दरानेच विक्री

मुंबई, ता. 25 : सरकारने कोविड सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणांचे दर निश्चित केले असले तरी चढ्या दराने उपकरणांची विक्री सुरू आहे. ऑनलाईन बाजारात अव्वाच्या सव्वा किंमतीला फेस मास्क विकले जात आहेत. याविरोधात ऑल इंडिया फूड एँड ड्रग्स लायसेंस होल्डर फाउंडेशनने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. 

आरोग्य विभागाने फेस मास्क, फेस शिल्ड, पीपीई कीट तसेच सॅनिटायझरचे दर निश्चित केले आहेत. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किंमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले. 

राज्यात एन 95 मास्क 19 ते 49 रूपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्कच्या किंमती तिन ते चार रूपये निर्धारित करण्यात आल्या. याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय देखील जाहीर केला. मास्कच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात यासाठी राज्याने पुढाकार घेतला. दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दर निश्चित करण्यापुर्वी उत्पादक, पुरवठादार तसेच वितरकांशी चर्चा देखील केली होती. 

ऑनलाईन बाजारात फेस मास्क चढ्या दराने विकले जात आहेत. 50 रूपयांच्या आत मिळणारे मास्क चक्क 200 ते 250 रूपयांना विकले जात आहेत.  250 रूपयांचे 5 मास्कचे बंडल ऑनलाईन बाजारात चक्क 1000 ते 1200 रूपयांना विकले जात आहेत. मास्कसंबंधी अनेक जाहीराती सध्या बघायला मिळत आहेत. या विक्रिवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत असल्याचे ऑन इंडीया फूड एँड लायसेंस होल्डर पाऊंडेशसन चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. याबाबत एआयएफडीएलएफ ने मुख्यमंत्री तसेच एडीए कडे तक्रार दाखल करून यावर कारवाई करण्याची मागणी देखील पांडे यांनी केली आहे.

महत्त्वाची बातमी :  "नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी

कोरोना सुरक्षा उपकरणांचे दर केवळ राज्यात निर्धारित केले आहेत. इतर राज्यात त्यावर नियंत्रण नसल्याने ऑनलाईन विक्री चढ्या दराने होत असल्याचे दिसते. यावरील कारवाईत तांत्रिक अडचणी असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर देखील कारवाईचे पाऊल लवकरच उचलण्यात येईल, असं डॉ. डि. आर. गहाणे ( सहाय्यक आयुक्त , अन्न व औषध प्रशासन) म्हणालेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

rates of covid mask on higher side even after state government regulated rates of covid equipment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com