सावधान, पुढे धोका आहे ! गेल्या दोन वर्षात मुंबईतील तीन रस्त्यांवर 126 जणांना मृत्यूने गाठलंय

सावधान, पुढे धोका आहे ! गेल्या दोन वर्षात मुंबईतील तीन रस्त्यांवर 126 जणांना मृत्यूने गाठलंय

मुंबई, ता. 25 : मुंबईतील घाटकोपर - माहूल रोड, जोगेश्वरीचा बाळासाहेब ठाकरे फ्लायओवर आणि घाटकोपरचा वसंतदादा पाटील मार्ग हे तीन मार्ग मुंबईतील सर्वाधिक जिवघेणे मार्ग ठरले आहेत. या मार्गांवरवं 2017 ते 2019 या दोन वर्षात सर्वाधिक अपघात झाले असून यामध्ये 126 जणाचा मृत्यू झाला आहे.  ब्लुमबर्ग फाऊंडेशने हा निष्कर्ष काढला आहे. फाउंडेशने 2017 पासूनच्या मुंबईतील रस्ते अपघाताच्या संख्येचा अभ्यास केला. 

  • 1.36 किलोमीटर लांब असलेल्या घाटकोपर-माहूल रोडवर 2017 ते 2019 या दोन वर्षात  रस्ते अपघातात जवळपास 56  जणांचा मृत्यू झाला आहेत. म्हणजे प्रति किलोमीटरमागे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 
  • पश्चिम दुतगती महामार्गाला जोडणारा 1.1 किलोमीटर लांबीचा बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल मार्गावर या काळात 38  जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
  • तर  घाटकोपरच्या वंसतदादा पाटील मार्गावर 2017-19 या कालावधीत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

वार्षिक रस्ते सुरक्षा अहवालातील ही आकडेवारी  आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या माहितीचा अभ्यास करुन ब्लुमबर्ग फाऊंडेशनने हा निष्कर्ष काढला आहे. 

चेंबुरचा अमर महाल 

चेंबुरचे अमर महाल हे जंक्शनही धोकायदायक आहे. दोन वर्षाच्या कालावधीत या  टिकाणी  25 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त जखमी झालेत. म्हत्वाचे म्हणजे 250 मीटरच्या परिसरात हे अपघात झालेत. विक्रोळीचा गोदरेज जक्शंनही असाच धोकायदाय आहे. 2017-19 या कालावधीत 28 जणांचा मृत्यू झाला तर 42 जण जखमी झालेत. 

दोन मोठ्या महामार्गाला जोडणारे जोडरस्ते जिवघेणे ठरताहेत असही या अभ्यासातून पुढे आलय. पश्चिम दुतगती महामार्गावर जोडरस्ते  येणाऱ्या  जोगेश्वरी, सांताक्रूझ,वांद्रे भागात 161 मृत्यू आणि जखमींची नोंद आहे. तर पुर्व द्रूदगती महामार्गावला जोडणाऱ्या कुर्ला, घाटकोपर आणि कांजुरमार्ग इथल्या जोडरस्तावर या कालावधीत एकुण 111 मृत्यू झालेत. 

ब्लुमबर्गच्या अभ्यासात गेल्या पाच वर्षात मुंबईत रस्ते अपघात,जखमींचे प्रमाण 25 टक्क्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण कमी होणे  एक मोठी उपलब्धी असल्याचे संयुक्त पोलिस आयुक्त (ट्राफीक) यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.  इंटलीजंट ट्राफीक मॅनेमजमेंट प्रणालीमुळे अपघाताची संख्या कमी झाल्ये ते सांगतात. 2019 मध्ये राज्य सरकारने या वाहतूक प्रणालीसाठी  891 कोटी रुपये खर्च केले.

मुंबईत रस्ते अपघातात ठार होणाऱ्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 47 टक्के प्रमाण पादचाऱ्यांचे आहे, तर 41 टक्के मोटरसाय़कल, तर दोन टक्के सायकस्वार आहे. गेल्या वर्षी झालेल्या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये 80 टक्के पुरुष होते, त्यातही सर्वाधिक संख्या ही 20 ते 29 या वयोगटातील होती. 

हेही  रस्तेआहेत ही  धोकायदायक

  • पश्चिम दुतगती महामार्ग 
  • पुर्व दुतगती महामार्ग 
  • सायन - पनवेल मार्ग
  • सांताक्रूझ - चेंबुर लिंक रोड
  • आरे कॉलनी रोड
  • गोरेगाव - मुलुंडू लिंक रोड
  • जे जे फ्लायओवर

most dangerous roads and roads where people lost their life due to accident

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com