रवी पाटील पालिकेचे अतिरिक्त आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नवी मुंबई - महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या जागी नगरविकास विभागाने रवी पाटील यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडून गुरुवारी त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एका जागेवर आधीच प्रतिनियुक्तीवर एक अधिकारी असताना पुन्हा दुसऱ्या जागेवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त म्हणून आलेले अंकुश चव्हाण यांची मुदत संपल्यानंतर त्यांची बदली केल्यामुळे त्यांच्या जागी महापालिकेतील स्थायी अधिकाऱ्यांपैकी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे शहर अभियंते मोहन डगांवकर यांच्याकडे रामास्वामी यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवला. त्यांची येथे वर्णी लागावी, यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्तावही पाठवला होता. 

Web Title: Ravi Patil Additional Commissioner of Police

टॅग्स