कुख्यात रवी पुजारीच्या हत्येचा कट? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - सांताक्रूझ परिसरातून दोन गुंडांना पोलिसांनी अटक करून चार पिस्तुले आणि 29 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी अशी त्यांची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी भांडण झाल्यानंतर बंगाली मुंबईत स्वतःची टोळी सुरू करणार होता. त्याने दोघांच्या हत्येची सुपारी घेतली होती, तसेच पुजारीची हत्या करण्याचाही त्याचा डाव होता, असे चौकशीत उघड झाले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सांताक्रूझ परिसरात दोन जण शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष क्र. नऊचे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बंगाली आणि देवरमानी यांना ताब्यात घेतले. अंगझडतीत दोघांकडे चार पिस्तुले आणि 29 जिवंत काडतुसे आढळली. बंगालीने 2006 मध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार केला होता. त्याने 2008 मध्ये नवी मुंबईत देविदास चौगुले यांची हत्या केली होती. त्याचप्रमाणे 2015 मध्ये लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात त्याचे नाव आले होते. 

सराईत बंगाली पूर्वी रवी पुजारीसोबत काम करत होता. पुजारीशी भांडण झाल्यानंतर चिडलेला बंगाली त्याची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. देवरमानी हा उत्तर प्रदेश आणि बिहार येथून शस्त्रे आणून गुन्हेगारांना पुरवण्याचे काम करतो. या दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 

Web Title: Ravi pujari plot of murder