मुंबई मनपाचे विरोधीपक्षनेते रवी राजा म्हणतात २०२२ च्या निवडणूक स्वबळावर लढवल्या जाव्यात, महाविकास आघाडीत खळबळ ?

मुंबई मनपाचे विरोधीपक्षनेते रवी राजा म्हणतात २०२२ च्या निवडणूक स्वबळावर लढवल्या जाव्यात, महाविकास आघाडीत खळबळ ?

मुंबई : देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. या महापालिकेचं बजेट काही राज्यांच्या बजेट एवढं मोठं. अशात येत्या २०२२ मध्ये येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झालीये. काल भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. यंदा मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवण्याचा निश्चय भारतीय भारतीय जनता पक्षाने केलाय. अशात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून देखील २०२२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार सुरु आहे. 

याबाबत मुंबई महापालिकेतील विरोधीपक्षनेते आणि काँग्रेचे नेते रवी राजा यांनी माध्यमाशी चर्चा केली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी नाही. इथं मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत आहे तर आम्ही विरोधीपक्षात आहोत. पक्षाचे राज्य प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत आमची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबईतल्या बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याचे मत व्यक्त केलं आहे. दरम्यान आम्ही स्वबळावर मुंबई महापालिका लढवण्याच्या तयारीत असलो तरी याचा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठी घेतील. राज्यात आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्तेत असतानाही मुंबईत मात्र वेगवेगळे लढलो होतो, असं रवी राजा म्हणालेत. 

राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहे. यापुढे प्रत्येक निवडणूक एकत्र लढवणार असं वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. मात्र राज्याच्या सत्तेत एकाच गादीवर बसलेले असतानाही, काँग्रेस आणि शिवसेना राज्यपातळीवर एकत्र असतानाही मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मुंबई काँग्रेसच्या अनेक नेत्यांची इच्छा असल्याचं स्पष्ट आहे. काँग्रेसच्या या इच्छेमुळे महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात. 

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी चढाओढ 

मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे याआधीच करण्यात आली होती. त्याचवेळी मुंबई पालिकेच्या सर्व २२७ जागा लढवल्या जाव्यात अशी मागणीही काँग्रेसने केलेली होती. 

एकीकडे काल भारतीय जनता पक्षाने सर्व २२७ जागा लढवण्याचा निर्धार केलाय. तर आता काँग्रेसच्या रवी राजा यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीये. त्यामुळे २०२२ मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुका चांगल्याच रंगणार हे स्पष्ट आहे. 

ravi raja congress opposition leader BMC election 2022 want to contest election on their own

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com