रविंद्र चव्हाण साहेब विसरेलत की ते कॅबिनेट मंत्री आहेत - दीपेश म्हात्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra chavan

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा झाला. शहरातील विकास कामावरून पालिका प्रशासनावर झोड उठवली.

रविंद्र चव्हाण साहेब विसरेलत की ते कॅबिनेट मंत्री आहेत - दीपेश म्हात्रे

शिंदे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे म्हणाले, चव्हाण साहेब कदाचित विसरले आहेत की ते कॅबिनेट मंत्री झालेत. गेले दोन वर्ष त्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये घालवले. 470 कोटीचा कुठलाही निधी मंजूर झाला नसताना वारंवार सांगायचे की 470 कोटी मंजूर झाले होते ते रद्द केले. 370 कोटी मंजूर झाले ते कोणी सांगत नाही ? माझा त्यांना सवाल आहे की 13 वर्षात त्यांनी डोंबिवलीमध्ये विकास काम रखडवून जे पाप केले आहे ते लपवण्यासाठी कदाचित ते आरोप करत असतील असे म्हात्रे म्हणाले.

डोंबिवलीमध्ये येणारे दोन मुख्य रस्ते मानपाडा रोड आणि घरडा सर्कलने पेंढारकर कॉलेज कडे जाणारा रस्ता. हे दोन महत्त्वाचे रस्ते असून पीडब्ल्यूडी च्या अंर्तगत ते येतात त्यांनी काल बोलताना सांगितले की 72 तासात खड्डे बुजवले पाहिजे. त्यांना मंत्री होऊन तर दीड महिना झाला दीड महिन्यात ते दोन रस्त्यावरील देखील खड्डे बुजू शकले नाही. डोंबिवलीकरांना जरासाही दिलासा देऊ शकले नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे त्यांना लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. आपल्याकडं त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या ते मुख्यमंत्र्यांबरोबर गुवाहाटीला देखील होते. विमानात देखील त्यांच्या बाजूलाच ते बसले होते. त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगायला पाहिजे होतं. आता रस्ते काम निधी तुम्ही करा आम्ही आधीच 370 करोड दिलेले आहेत म्हणून माझं म्हणणं आहे की चव्हाण साहेबांनी आपली पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करणं बंद कराव असा सल्ला देखील म्हात्रे यांनी चव्हाण यांना देऊ केला आहे.

Web Title: Ravindra Chavan Dipesh Mhatre Politics Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..