

डोंबिवली : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार याद्यांतील गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढत असून यावरून आता राजकारण तापले आहे. ठाकरे बंधूंनी दुबार व तिबार मतदार आणि ‘सावळा गोंधळ’ यावर थेट निवडणूक आयोगाला जाब विचारल्यानंतर, आता सत्ताधारी भाजपनेही या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच स्वतः पुढाकार घेत मतदारयादीतील गैरव्यवहारांवर संताप व्यक्त केल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट जाब विचारत निवडणूक रद्द करा अशी मागणी केली आहे.