
डोंबिवली : मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाईल या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. उद्या मंगळवारी मुंबईत चव्हाण यांच्या प्रदेश अध्यक्ष पदाची घोषणा करण्यात येणार आहे. चव्हाण यांच्याकडे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा असून आता महाराष्ट्र राज्याची धुरा त्यांच्या खांद्यावर असणार आहे.