ठाणे : मुंबई-ठाण्यासह कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून, सर्व शाळा व महाविद्यालयांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करावी, अशी विनंती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.