

BJP State Chief Ravindra Chavan
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकात झालेल्या महायुतीच्या प्रचार मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांनी, “मोठा मित्रही लवकरच येणार आहे,” असे विधान केल्याने आता तो ‘मोठा मित्र’ नेमका कोण, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.