26/11 Mumbai attack: अपयशाची जबाबदारी स्वीकारुन 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

26/11 terrorist Attack

26/11 Mumbai attack: 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला (26/11 attack) आज १३ वर्ष पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या (Terror attack) आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात १६६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. २९३ जण जखमी झाले होते. या भयाण हल्ल्याच्या स्मृती मुंबईकरांच्या मनात कायमस्वरुपी कोरल्या गेल्या.

हा हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी 27 नोव्हेंबर २००८ रोजी रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे सचिव अशोक चुर्तेवेदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल तत्कालिन 'रॉ' प्रमुखांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयबा आणि ISI ने मिळून हा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह यांची न्यायालयात धाव

या २६/११ हल्ल्यासंबंधी 'रॉ' ला अलर्ट्स मिळाले होते आणि त्यांनी ते आयबीला पाठवले होते. अशोक चुर्तेवेदी यांनी ते अलर्ट्सही दाखवले होते. विशेष सचिव अनिल धसमाना यांनी आयबीला विशेष अलर्ट्सही दिले होते. या अलर्टसाठी सीआयए आणि इस्रायलच्या मोसादचीही मदत घेण्यात आली होती. रॉ ने जारी केलेल्या अलर्टच्या यादीत नरीमन हाऊसचा स्पष्ट उल्लेख होता.

हेही वाचा: गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक

२६/११ हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसला लक्ष्य केलं होतं. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी २० नोव्हेंबर २००८ रोजी अलर्ट जारी केला होता. कराची बंदरातून हे १० दहशतवादी अल हुसैनी बोटीतून निघाले होते. त्यांनी एमव्ही कुबेर या ट्रॉलरचं अपहरण करुन ते बोटीतून मुंबईत दाखल झाले.

loading image
go to top