

Major Blow to Industry: ‘Raymond Man’ Passes Away
esakal
मुंबईत शनिवारी सायंकाळी रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिला असून, त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबईतच निधन झाले असून रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.