esakal | FD वर मुदतीनंतर बचत खात्याप्रमाणे मिळणार व्याज
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

FD वर मुदतीनंतर बचत खात्याप्रमाणे मिळणार व्याज

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : बँकेत एफडी करणाऱ्यांना (Bank Fixed Deposit) आता त्यांची मुदत संपल्यावर लगेच एफडींची मुदत वाढविणे (FD tenure) किंवा त्या मोडून पैशांचा विनियोग करणे अनिवार्य झाले आहे. कारण आता एफडींची मुदत संपल्यानंतर त्यावर सेव्हिंग खात्याचे व्याज (Saving account interest) लागू होणार आहे. (RBI changes Bank FD Account tenure Rule saving account interest follows)

हेही वाचा: काय आहे मुंबईतील कोरोना अपडेट? जाणून घ्या सविस्तर माहिती

रिझर्व्ह बँकेने नुकतेच यासंदर्भात परिपत्रक काढून ही बाब स्पष्ट केली आहे. यापूर्वी एफडीची मुदत संपली व खातेदाराने त्याबाबत बँकेला काहीही कळवले नाही तरीही तिची जेवढी मुदत होती तेवढ्याच मुदतीसाठी ती पुढेही आपोआप वाढवली जात होती. त्यामुळे खातेदारांना तोच जादा व्याजदर मिळत होता. अशा स्थितीत ज्यांना मुदतवाढ हवी असेल ते खातेदार निश्चिंत असत व ते केव्हाही एफडी रिन्यू करण्यासाठी जात असत. मात्र आता तसे होणार नाही. आरबीआय च्या परिपत्रकानुसार एफडी ची मुदत संपली की त्या रकमेवर सेव्हिंग खात्याचा व्याजदर सुरु होईल.

loading image