

RBI Digital Fraud Prevention Plan Customers May Get More Control Over Online Transactions and Banking Security Measures
sakal
मुंबई: डिजिटल व्यवहारांमधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हाती अधिक नियंत्रण देण्याच्या दृष्टीने नवी सुरक्षाव्यवस्था आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, ग्राहकांना डिजिटल व्यवहारांची मर्यादा स्वतः निश्चित करता येणार असून, संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी सर्व डिजिटल डेबिट व्यवहार तातडीने बंद करण्याची सुविधाही मिळणार आहे. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी विश्वासू व्यक्तीची मंजुरी घेण्याची अतिरिक्त तरतूदही प्रस्तावित करण्यात आली आहे.