कारवाईनंतर पुन्हा फुलली नर्सरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

बेलापूर - नेरूळ जिमखाण्यासमोरच्या भूखंडावरील बेकायदा झोपड्या आणि नर्सरीवर सिडकोने मंगळवारी (ता. १६) कारवाई केली, परंतु त्यानंतर काही तासांतच तेथे पुन्हा झोपड्या बांधल्या असून नर्सरीही सुरू झाली आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिडकोने हा भूखंड रिकामा करून त्याला कुंपण घालावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नवी मुंबईत सिडकोचे अनेक राखीव भूखंड आहेत. या भूखंडांवर बेकायदा झोपड्या बांधल्या जातात. काही ठिकाणी बेकायदा डेब्रिज टाकले जाते; तर काही ठिकाणी बेकायदा नर्सरी आहेत. त्यावर सिडको अनेकदा कारवाई करते, परंतु या भूखंडांवरील डेब्रिज आणि कचरा हटवत नाही. त्याचा त्रास शेजारच्या सोसायटींमधील रहिवाशांना होतो.

 सेक्‍टर २८ मधील नेरूळ जिमखान्यासमोर आणि ज्वेल ऑफ नवी मुंबई समोरच्या सेक्‍टर ३० येथील बालाजी टेकडीवरील बेकायदा झोपड्यांवर सिडकोने अनेकदा कारवाई केली. गेल्या आठवड्यात १६ मे रोजी पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. त्या वेळी शेजारच्या नर्सरीवरही कारवाई केली. नर्सरीतील शेकडो फुलांची आणि शोभेची झाडे, कुंड्या, तुळशी वृंदावन, मडकी जप्त केली. परंतु या कारवाईनंतर दोन दिवसांत तेथे पुन्हा बेकायदा नर्सरी सुरू झाली. तेव्हा सिडकोने वारंवार अशा कारवाईवर पैसे खर्च करण्यापेक्षा एकदाच कारवाई करून भूखंडाला कुंपण घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सिडकोच्या अनेक भूखंडांना कुंपण घातले आहे. काही भूखंडांना कुंपण घातलेले नाही, परंतु त्यांनाही कुंपण घालून ही समस्या कायमची निकालात काढली जाईल.
- मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Re-flowering nursery after taking action