'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री', भाजप कोअर कमिटीत ठरलं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्तासाथापानेचा पेच : नुकतीच भाजपचे प्रदेशाधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारं 24 तास उघडी असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार?

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी आग्रही भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, असं म्हणज संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या निव्वळ अफवा आहेत, असंही ते म्हणालेत. शरद पवारांशी संपर्कात असल्याच्या वृत्तालाही राऊतांनी दुजोरा दिलाय. तरुण भारतमधून करण्यात आलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

Google Pay युझर्ससाठी 'काय' आहे धोक्याची घंटा..

पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार:

भाजपच्या प्रतिसादाची पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. अन्यथा शिवसेना प्लॅन 'बी' ची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेसोबत भाजपची युती आहे. त्यामुळं आताही सत्ता स्थापनेसाठी भाजप हाच पहिला पर्याय असेल, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असा शिवसेनेचा प्लॅन 'बी' असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

WebTitle : reaction of chandrakant patil on maharashtra government formation and talks with shivsena

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of chandrakant patil on maharashtra government formation and talks with shivsena