Google Pay युझर्ससाठी काय आहे धोक्याची घंटा..

Google Pay युझर्ससाठी काय आहे धोक्याची घंटा..

हल्ली मोठ्याप्रमाणावर कॅशलेस व्यवहार होत असतात. यात अनेक कंपन्यांकडून आता पेमेंटबँक हा ऑपशन मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतोय. अशात अनेकवेळा योग्य माहिती नसल्याने अनेकजण फसवले जातात. अश्या काही तक्रारी मोठ्या प्रमाणावर मुंबईतून आता येताना पाहायला मिळतंय.  यामध्ये सर्वात जास्त तक्रारी 'गुगल पे' संदर्भात येतायत. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पे मुळे तुमचे पैसे धोक्यात आहेत. विश्वास बसत नसेल तर अलिकडच्या या काही घटना बघा. 

  1. लोअर परळ इथल्या पूजा पंडित यांना चक्क कस्टमर केअर मधील व्यक्तीनेच गंडा घातला. मदत करणाऱ्या व्यक्तीने त्यांचा बँक तपशील आणि 'गुगल पे'चा पिन नंबर घेऊन दोन लाख काढले.
  2. एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या महिलेने सोफा कम बेड ऑनलाइन विक्रीसाठी ठेवला. खरेदी करणाऱ्याने या महिलेच्या 'गुगल पे'चा तपशील घेऊन पैसे देण्याऐवजी १२ हजार लांबवले.
  3. गॅस दुरुस्तीसाठी 'गुगल पे' वरून दहा रुपये पाठविण्यास सांगून गॅस प्रतिनिधी म्हणवणाऱ्याने पवईतील तरुणाच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले
  4. नवीन क्रेडिट कार्डसाठी दोन रुपये 'गुगल पे' करण्यास सांगून अँटॉप हिल येथील अमिताभ राजवंश याच्या खात्यातून ५० हजार परस्पर वळविण्यात आले

आणखी बातम्या वाचा 


नक्की होतंय काय ? 

मुख्यत्वे मुंबईत हे प्रकार वाढल्याचं पाहायला मिळतंय. गुगल-पे साठी लिंक पाठवून भामटे खात्यातून पैसे काढून घेतायत. त्यामुळे तुम्हाला कोणी अशी लिंक पाठवली आणि पैशांची मागणी करत असेल तर जरा सावधगिरी बाळगा. 

काय काळजी घ्याल ? 

  • तुमच्या मोबाईलवर आलेला OTP कुणालाही सांगू नका पाठवू नका 
  • ऑनलाइन वस्तू मागवताना कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाला प्राधान्य द्या.
  • खात्री पटत नाही तोपर्यंत 'गुगल पे' किंवा अन्य पेमेंट अ‍ॅपवर पैसे पाठवू नका.
  • बँक खात्याचा तपशील आणि गोपनीय क्रमांक कधीही शेअर करू नका. 
  • कोणात्याही व्यवहारासाठी 'गुगल पे'ची लिंक पाठवण्याची गरज नसते.
  • 'गुगल पे'च्या लिंकमधील आपल्या माहितीचा सायबर हॅकर्सना फायदा होतो. 

आणखी बातम्या वाचा : 

लोकहो ऑनलाईन किंवा मोबाईलवरून पैसे पाठवणे किंवा मागवून घेणे असे व्यवहार करताना अत्यंत सावधानता बाळगा.  आपल्या समोरील धोके वेळीच ओळखा. म्हणजे तुमच्या कष्टाच्या कमाईवर भामट्यांचा डल्ला पडणार नाही. 

Webtitle : very important news for all google pay users

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com