नानावटीचा बदमाशपणा अखेर उघड, ऑडिट रिपोर्टमध्ये कोणता 'मोठा' खुलासा झालाय? वाचा...

नानावटीचा बदमाशपणा अखेर उघड, ऑडिट रिपोर्टमध्ये कोणता 'मोठा' खुलासा झालाय? वाचा...

मुंबई : जुहूमधील डॉ बालाभाई रुग्णालय कोरोना रुग्णांची लूट करत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने कारवाई केली होती. पालिकेने केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये हे रुग्णालय रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारे अतिरिक्त दर आकारून लुटत असल्याचे समोर आले आहे. 31 मे रोजी दाखल झालेल्या 52 वर्षीय कोरोना बाधित महिलेवर या रुग्णालयाने 6.78 लाखाचे बिल फाडले होते.

रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्ण महिलेला 5 पीपीई किटचे वाढीव दर आकारले. इतकेच नाही तर पीपीई किटचाच भाग असलेल्या एन 95 मास्कसाठी वेगळे दर वसूल केले. याशिवाय रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्ण महिलेच्या काही अनावश्यक चाचण्या देखील केल्या असून त्या चाचण्या रात्री 1 ते 3 च्या दरम्यान केल्या असल्याचे ऑडिट मध्ये समोर आले आहे. 

पालिकेने ऑडिट रिपोर्ट नुसार गेल्या आठवड्यात रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल केला. त्यामध्ये पालिकेने रुग्णालयावर कलम 188 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. रुग्णालयाचे विश्वस्त आणि अध्यक्षांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांनी त्या रुग्णाकडून पॅरासीटमल औषधाचे अव्वाच्या सव्वा दर आकारले आहेत. पॅरासिटामॉल, बी कॉम्लेक्स आणि ऍस्पिरिन सारख्या गोळ्या अतिशय माफक दरात उपलब्ध होतात. मात्र या रुग्णालयाने पॅकेजमध्ये असून देखील या औषधांसाठी वाढीव दर आकारले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्या महिला रुग्णाची एक चाचणी अनेकदा करण्यात आली असून अधिक आकारण्यासाठी या चाचण्या रात्री 1 ते 3 च्या दरम्यान करण्यात आल्या आहेत. "ब्लड गॅस अनलिसिस" आणि "सी रिऍक्टिव्ह प्रोटेन" चाचण्यांची काहीही आवश्यकता नसल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशीवाय रुग्णालयाने दिवसाला 12 तासांपेक्षा अधिक वेक ऑक्सिजन लावल्याचे वाढीव दर आकारले आहेत.

रुग्णालय प्रशासनाने 11 मे ते 13 जून दरम्यान कोविड19 उपचारांबाबत आखून दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केले असून ठराविक दरांपेक्षा अधिक दर आकारले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रूग्णालय प्रशासनाने अश्या प्रकारे अनेक रुग्णांना बिल आकारल्याच्या तक्रारही असल्याचे नोडल अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. मात्र बिलात काही चुका झाल्या होत्या, त्या आम्ही दुरुस्त केल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्या प्रकारे वाढीव बिलाच्या अनेक तक्रारी असून रुग्णालय प्रशासन अश्या प्रकारे वाढीव बिल देत असेल तर पुढे ही गुन्हे दाखल करून अधिक कडक कारवाई करणार असल्याचे नारनवरे यांनी सांगितले.

अश्या प्रकारे 23 दिवस उपचार घेतलेल्या एका अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला देखील 6.5 लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. 'केअर ऍण्ड हायजीन' साठी 53 हजार 850 तर 'स्टाफ मॅनेजमेंट' साठी 38 हजार रुपये लावण्यात आले होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडे हे प्रकरण गेल्या नंतर त्यांनी चौकशी ची मागणी केली होती. पालिकेने आतापर्यंत किती बिलांचे ऑडिट केले याची माहिती द्यावी अशी मागणी हे देशपांडे यांनी केली. याच रुग्णालयात दगावलेल्या 52 वर्षीय महिलेला दिलेल्या बिला प्रकरणी देखील आम्ही तक्रार केली. गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. पोलीस जर गुन्हेगारांना पाठीशी घालणार असतील तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नसल्याचा इशारा देशपांडे यांनी दिला.

नानावटी रुग्णालयाचे प्रवक्त्यानी याप्रकरणी बोलतांना सांगितले की "आम्हाला एफआरआयची कॉपी मिळाली आहे. याबाबत वरिष्ठांना सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. तर या प्रकरणी जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून आवश्यक कागदपत्र जमवण्यात येत असल्याचे संताक्रूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण श्रीराम कोरेगावकर यांनी सांगितले.

राज्य सरकारने गेल्याच महिन्यात खासगी रुग्णालयांसाठी कोविड तसेच नॉन किविड उपचाराचे दर निश्चित केले आहेत. सरकारने निश्चित केलेले हे दर खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटांना लागू झाले असून 20 टक्के खाटांचे दर हे रुग्णालय प्रशासनाला आकारता येणार आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत हे दर कायम राहणार आहेत.

read how nanatwati hospital did unwanted test and charged fortune for common medicines

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com