मध्य आणि पश्चिम रेल्वेला चोरांची वाळवी, आतापर्यंत चोरी झालं 'एवढं' सामान

मध्य आणि पश्चिम रेल्वेला चोरांची वाळवी, आतापर्यंत चोरी झालं 'एवढं' सामान

मुंबई : रेल्वे प्रशासन गाड्यांमध्ये प्रवाशांना योग्यत्या सुविधा पुरवत नाही असं खापर नेहमीच रेल्वे प्रशासनावर फोडलं जातं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून सतत उत्तम सोयीसुविधा रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येतात. यात उत्तम दर्जाचे बेसिन, नळ, आरसे इत्यादि वस्तु रेल्वे गाड्यांमध्ये बसवण्यात येतात. मात्र सर्व उत्तम दर्जाच्या वस्तु रेल्वे गाड्यांमध्ये बसवल्यानंतर या वस्तूंचं चोरी  होण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे.

प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या काही स्पेशल आणि लक्झरी रेल्वे गाड्यांचे चोरट्यांकडून अक्षरक्ष: हाल करण्यात आले आहेत. मागच्या काही काळात रेल्वेच्या ८० उत्तम दर्जाच्या गाड्यांमधील स्टीलचे तब्बल ५ हजार नळ, २ हजार आरसे, ५०० सोप बॉक्स आणि ३ हजार फ्लश व्हॉल्व चोरीला गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधा हवी आहे की या सगळया वस्तु यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

विशेष म्हणजे रेल्वेनं प्रवाशांना उत्तम सुविधा आणि दुर्गंधी मुक्त वॉशरूम मिळावे यासाठी सुमारे ३०० उत्तम दर्जाच्या रेल्वेगाड्या सुरू केलया होत्या. या रेल्वे गाड्यांच्या सुशोभीकरणासाठी रेल्वे प्रशासनानं तब्बल ४०० कोटी इतका खर्च केला होता. मात्र या रेल्वे गाड्यांपैकी ८० रेल्वे गाड्यांमधून तब्बल ६० लाखांपेक्षा जास्त किमतीचं सामान चोरी करण्यात आलं आहे.

एका उत्तम दर्जाच्या रेल्वे गाडीसाठी रेल्वेकडून तब्बल ६० लाख रुपये खर्च केले आहेत. रेल्वे गाडीतला एक नळ १०८ रुपयांचा आणि आरसा ६०० रुपयांचा होता. चोरीच्या प्रकारामुळळे मध्य रेल्वेला १५.२५ लाख रुपयांचा फटका बसला आहे आणि  पश्चिम रेल्वेचं ३८.५८ लाखांचं नुकसान झालं आहे.

रेल्वेनं सुविधा पुरवायच्या आणि चोरट्यांनी रेल्वे गाड्यांची दयनीय अवस्था करायची असंच काहीसं चित्र दिसून येतंय. त्यामुळे आता या चोरट्यांना थांबण्यासाठी रेल्वे प्रशासन काय पावलं उचलतं हेच बघाव लागेल.

read report on how many water taps mirrors and flush wales are stolen from railways 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com