मुंबईत रिअल इस्टेटची बूम, डिसेंबर महिन्यात घरांची विक्रमी विक्री

मुंबईत रिअल इस्टेटची बूम, डिसेंबर महिन्यात घरांची विक्रमी विक्री

मुंबई, ता. 31 : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे यंदा मुंबईत घरांची विक्रमी नोंद झाली आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत तब्बल 18 हजार 853 घरांची विक्री झाली असून यामुळे सरकारच्या तिजोरीत 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका महिन्यातील मुंबईतील ही विक्रमी नोंदणी झाल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाउनमुळे सर्व क्षेत्राला आर्थिक फटका बसला. गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली होती. त्यामुळे घर खरेदीला चालना मिळाली. यातच विकसकांनाही घर खरेदीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचे जाहीर केले. यामुळे यंदा खरेदीदारांकडून घर खरेदीची लगबग सुरू होती.

गेल्या वर्षी संपूर्ण महिन्यात 10 हजार 840 कोटींचे व्यवहार झाले होते. यंदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांतच 13 हजार 450 कोटींचे व्यवहार नोंदविले गेले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई शहरात 6,433 मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी झाली होती. अखेर 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत 18 हजार 853 घरांची खरेदी विक्री झाली आहे. यातून 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

real estate boom in mumbai record break houses sold in the month of December

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com