esakal | कसं समजेल सरकार तुमचे WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?
sakal

बोलून बातमी शोधा

कसं समजेल सरकार तुमचे WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

तुम्हाला ३ निळ्या टिक्स दिसल्यात तर तो मेसेज सरकारने वाचला, तीन निळ्या टिक्स लाल झाल्यात म्हणजे तुमच्यावर सरकारने कारवाईला सुरवात केलेली आहे?

कसं समजेल सरकार तुमचे WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलंय. अशात भारतातही कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळतोय. भारताने वेळेवर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेल्याने भारतात कोरोनाचा गुणाकार झाला नाही. मात्र लॉक डाऊनच्या काळात कोरोनापेक्षा जास्त कशाचा धोका असेल तर तो म्हणजे सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या खोट्या मेसेजेसचा. भारतात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वारपणारी लोकसंख्या आहे. अशात WhatsApp युनिव्हर्सिटीमधून जी माहिती पसरतोय ती कोरोनापेक्षा जास्त हानिकारक आहे. खुद्द WhatsApp बद्दल एक माहिती आता व्हायरल होतेय. त्याबद्दल सरकारने स्वतः एक ऍडव्हायजरी काढून या व्हायरल मेसेजचा खुलासा केलाय.

मोठी बातमी - मुंबईकरांनो...; तुम्ही कोरोनाच्या 'या' स्टेजमध्ये

काय आहे व्हायरल मेसेज : 

सध्या मोठ्या प्रमाणात फेक म्हणजे खोटे मेसेजेस पसरवले जातायत. या मेसेजमध्ये म्हटलंय की तुम्ही जेंव्हा कुणाला मेसेज पाठवतात तेंव्हा तो मेसेज समोरच्याला मिळाला की त्या मेसेज समोर तुम्हाला एक टिक दिसेल. यानंतर तोच मेसेज समोरच्याला पोहोचला की तुम्हाला २ टिक्स दिसतील. जर त्यांनी तो मेसेज वाचला तर २ निळ्या टिक्स दिसतील आणि तुम्हाला ३ निळ्या टिक्स दिसल्यात तर तो मेसेज सरकारने वाचला असा अर्थ काढा. या पुढे जात या मेसमध्ये म्हटलंय की जर या तीन निळ्या टिक्स मधील एक टिक लाल झाली म्हणजे तुमच्यावर सरकारने कारवाईला सुरवात केलेली आहे आणि तुम्हाला लवकरच समन्स बजावला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला येणारे कोणतेही असामाजिक, धार्मिक, सरकार विरोधी मेसेजेस पाठवायच्या आधी सावधानता पाळा, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे तुमच्या WhatsApp वर सरकारचं बारीक लक्ष आहे.   

मोठी बातमी - आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ! वाचा काय आहे संकल्पना
 
काय आहे सत्य ? 

खोटे मेसेजेस पसरवले जाऊ नये म्हणून चक्क आणखीन एक खोटा मेसेज पसरवला गेला. या मेसेजबाबत मुंबईतील सायबर पोलिसांकडून एक ऍडव्हाजरी म्हणजे माहितीपत्र जारी करण्यात आलंय. यामध्ये हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं नमूद करण्यात आलंय. तुमच्या खासगी WhatsApp संभाषणावर कुणाचीही  नाही. मात्र पोलिसांकडून सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरू नये म्हणून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये WhatsApp ग्रुप्सवर Admin only सेटिंग करण्याचा सल्ला देण्यात आलाय. 

याशिवाय आपल्याकडून कोणतीही अफवा पसरवली जाणार नाही यासाठी थोडं सतर्क राहा. एखादा मेसेज आला तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर शेअर करून खरं खोटं तपासा. जर मेसेज खरा असेल तरच तो आपल्या प्रियजनांना पाठवा.  

if you see three red ticks on whatsapp message you will get summonsed from government fact check         

loading image
go to top