मुंबई, ता. 26 : मुंबईत डिसेंबर महिन्याची 'हॉट इंट्री' ची परंपरा कायम पाहिली असून डिसेंबरच्या सुरूवातीच्या दोन आठवड्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसते. गेल्या 10 वर्षापासूनची ही स्थिती याहीवर्षी कायम राहिली असून यावेळी देखील डिसेंबरच्या सुरूवातीचे दिवस अतिशय उष्ण असल्याची नोंद झाली आहे.
डिसेंबर महिन्यातील सुरूवातीच्या दिवसात मुंबईतील कमाल तापमान 35 ते 36 अंशाच्या आपसाप म्हणजे अधिक असते. साधारणता 15 दिवस ही परिस्थिती दिसते. त्यानंतर मात्र कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसते. मागील 10 वर्षांपासून अशीच स्थिती राहिली आहे.
महत्त्वाची बातमी: अजूनही FASTag काढलेला नाही ? जाणून घ्या कसा मिळवाल फास्टॅग
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला भूभागाकडून दक्षिणीय वारे वाहू लागतात. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरणात बदल होत असून त्यानंतर कमाल तापमानात घट होत असल्याचे दिसते.
डिसेंबर महिन्यातील सुरूवातीच्या 15 दिवसात उच्च कमाल तापमान तर नंतरच्या 15 दिवसात कमाल तापमानात काहीशी घट होते. त्यानंतर थंडीचा जोर वाढत असल्याने डिसेंबर महिन्याचा अखेर काहीसा गारेगार जाणवतो. गेल्या 10 वर्षापासून ही परिस्थिती अशीच आहे.
महत्त्वाची बातमी: एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया
वर्ष -दिनांक (डिसेंबर )- कमाल तापमान - किमान कमाल तापमान - दिनांक
(कमाल तापमान 39.8 - 4 डिसेंबर 1987)
महत्त्वाची बातमी : "मरतुकड्या अवस्थेतील विरोधी पक्ष, हे चित्र बरं नव्हे"; सामनातून संजय राऊतांचे काँग्रेसला चिमटे
वर्ष -किमान तापमान - दिनांक (डिसेंबर) - कमाल किमान - दिनांक ( डिसेंबर )
( किमान तापमान 10.6 -20 डिसेंबर 1949)
record of hot weather in the moth of December continued since last ten years in mumbai
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.