चिंताजनक! राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद, दिवसभरात 54 रुग्ण दगावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 40, पुण्यात 6, जळगावमध्ये 2, सोलापूर शहरात 2, औरंगाबाद शहरात 2, वसई विरारमध्ये 1 तर रत्नागिरीत एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज एका दिवसभरात 1495 नवीन रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची एकूण संख्या 25 हजार 922 झाली आहे. तसेच आज दिवसभरात 54 रुग्ण दगावल्याने मृतांचा आकडा 975 वर पोहोचला आहे. दरम्यान, आज राज्यात 422 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 5547 रुग्ण बरे झाले आहेत. 

मोठी बातमी : CAPF चे साधारणतः २४०० जवान येणार महाराष्ट्रात ! मुंबई पुण्याला येणार का छावणीचं रूप?

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 40, पुण्यात 6, जळगावमध्ये 2, सोलापूर शहरात 2, औरंगाबाद शहरात 2, वसई विरारमध्ये 1 तर रत्नागिरीत एकाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष तर 21 महिला आहेत. आज झालेल्या 54 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 29  रुग्ण आहेत तर 21  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 54 रुग्णांपैकी 36 जणांमध्ये ( 67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 30 हजार 857 नमुन्यांपैकी 2 लाख 3 हजार 439 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून 25  हजार 922 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14  हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

A record number of corona positive in the maharashtra, 54 patients died during the day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A record number of corona positive in the maharashtra, 54 patients died during the day