Mumbai : कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर करणार; केडीएमसी हद्दीत 10 संकलन केंद्रे

केडीएमसी हद्दीत 10 संकलन केंद्रे सुरू होणार
recycle waste materials 10 collection centers KDMC mumbai
recycle waste materials 10 collection centers KDMC mumbaiesakal

डोंबिवली - कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या काही वस्तुंचे विघटन, त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडून 10 प्रभाग क्षेत्र हद्दीमध्ये कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर उपक्रमांतर्गत हा उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका हद्दीत राबविण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

नागरिकांकडून घरात वापरून झालेली जुनी खेळणी, दप्तरे, बूट, चप्पल, प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, वापरातील पण सुस्थितीत असलेली पुस्तके कचरा म्हणून फेकून दिली जातात. रद्दीत दिली जातात. अशा वस्तु पालिकेच्या माध्यमातून विविध संकलन केंद्रांवर जमा करायच्या.

या वस्तू शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था यांच्या ताब्यात द्यायच्या. ज्यामुळे कचरा केंद्रांवर चांगल्या स्थितीत असलेला कचरा जाणार नाही. या कचऱ्याचा शहरात पुनर्वापर करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. 20 मे ते 5 जूनपर्यंत कचरा संकलन केंद्रांवर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कचरा संकलित केला जाणार आहे.

recycle waste materials 10 collection centers KDMC mumbai
Mumbai News : मध्य रेल्वेची लोकल सेवा दररोजच १५ ते २० मिनिटे विलंबाने!

ही कचरा केंद्रे पाच स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहेत. प्रभागातील कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कचरा वेचक संघटना प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी असतील, असे आयुक्तांनी सांगितले. जमा टाकाऊ साहित्य पुनप्रक्रियेसाठी, वापरासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना दिले जाणार आहे. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी महिला बचत गटांना कापडी पिशव्या विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

recycle waste materials 10 collection centers KDMC mumbai
Mumbai Crime : अनेक वर्षांपासून सोन्याचा व्यापार करणाऱ्या सराफानेच घातला ग्राहकांना गंडा; आता...

कचरा संकलन केंद्रे

अ प्रभाग क्षेत्र, वडवली गाव, ब प्रभाग क्षेत्र, वाणी विद्यालयाजवळ, कल्याण, क प्रभाग क्षेत्र सुभाष मैदान, अत्रे मंदिरा जवळ, कल्याण, जे प्रभाग, भगवती अभिलाषा कन्ह्वेंचर, रेल्वे तिकीट खिडकीजवळ, कल्याण पूर्व, ड प्रभाग क्षेत्र, कल्याण पूर्व, फ प्रभाग क्षेत्र, जुने डोंबिवली विभागीय कार्यालय, ह प्रभाग क्षेत्र, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम, ग प्रभाग क्षेत्र, मारुती महादेव सोसायटी, सुनीलनगर, आय प्रभाग क्षेत्र, गायत्री सोसायटी, पिसवली, कल्याण पूर्व. ई प्रभाग कार्यालय, रिजन्सी इस्टेट, डोंबिवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com