esakal | लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट 

रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला आहे.

लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट 

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर गुरुवारी रायगडमध्ये देखील  अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदूर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तिथंही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासनानाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा देखील दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातही आज (बुधवारी) पावसाचा जोर वाढणार असून तिथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : "राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

बंगालच्या उपसागरातील या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत मंगळवारी दुपार नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशी परीस्थीती गुरुवारपर्यंत राहाणार आहे.गुरुवारी मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कुलाबामध्ये  मंगळवारी कमाल 31 आणि किमान 26.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुझ 32.5 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहाणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

red alert in raigad and sindhudurga heavy rain expected in thane palghar and mumbai