लाल मिरची नरमली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

ठाणे - विविध प्रकारचे मसाले बनविण्यासाठी वापरात येणारी लाल मिरची यंदाच्या वर्षी काहीशी नरमल्याचे चित्र आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांश शेतमालाचे भाव कडाडले असताना लाल मिरच्यांचे भाव बाजारात यंदाच्या वर्षी स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. लाल मिरच्यांचे भाव गेल्या वर्षीप्रमाणेच असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, घरोघरी मसाल्यांची लगबग सुरू झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर किरकोळ बाजारात मिरच्यांच्या भावात वाढ होताना दिसते. मागील वर्षीही भावात ३० ते ४० रुपयांची वाढ झाली होती. यंदा मात्र मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने घाऊक बाजारात मिरचीच्या भावात केवळ पाच ते दहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

Web Title: Red Chilly Rate

टॅग्स