Mumbai News : जे.जे.तील कॅथलॅब यंत्रालाच लालफितीचे ‘ब्लॅाकेजेस’

रुग्णालयातील दोन यंत्रांची दुरवस्था; ‘हाफकिन’कडून निविदा प्रक्रियेत दिरंगाई
red tape blockages only cathlab machine jj hospital Hafkin mumbai marathi news
red tape blockages only cathlab machine jj hospital Hafkin mumbai marathi newsSakal

मुंबई : सरकारी रुग्णालयात कधी डॅाक्टर नाहीत, औषधे नाहीत तर कधी रुग्णांवर उपचार करणारी उपकरणे बंद अवस्थेत आहे. ही सगळी परिस्थिती ग्रामीण भागातच नव्हे तर राज्य सरकारचे मध्यवर्ती रुग्णालय असणाऱ्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही.

सरकारी लालफीतीतील निविदा प्रक्रियेत अडकल्याने हृदय चिकित्सा करण्यासाठी अत्यावश्यक असणारे कॅथलॅब एक यंत्र पूर्ण बंद तर दुसरे यंत्र ‘व्हेंटिलेटर’वर असतानाही नवीन यंत्र खरेदीची प्रक्रिया केवळ निविदेच्या फेऱ्यातच वारंवार अडकून पडली आहे.

हाफकिन महामंडळाकडून या यंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया अर्धवट राहिल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे यंत्र जिल्हा नियोजन विकास निधीतून तातडीने खरेदी करावे, असे निर्देश दिले असले तरी पुन्हा एकदा निविदेच्या फेऱ्यात कॅथलॅब यंत्र अडकलेले आहे.

जे.जे. रुग्णालयातील दोन कॅथलॅब यंत्र १५ वर्षापेक्षा जुनी आहेत. त्यातील एक पूर्ण बंद तर दुसरे क्वचित वापरता येण्यासारखे आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून ‘जे. जे.त’ अॅंन्जिओग्राफी आणि ॲंन्जिओप्लॅस्टीसाठी येणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवले जाते.

या कॅथलॅब यंत्रासाठी निविदा प्रक्रिया वर्षभरापेक्षा अधिक काळ राबवूनही हाफकिन महामंडळाने निविदा प्रक्रिया केलेली नाही. अखेरीस हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून (डीपीडीसी) कॅथलॅब खरेदी करण्याचे निर्देश मंत्रालयामध्ये काल झालेल्या बैठकीत दिले. तरी हा मार्ग देखील निविदेचाच म्हणजेच लालफितशाहीच्या हाताखालूनच जाणार असल्याने कॅथलॅब यंत्राचा जे.जे.पर्यंतचा मार्ग खडतरच आहे.

कॅथलॅबच्या खरेदीसाठी ‘हाफकिन’ने काढलेल्या निविदेला केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिल्याने महामंडळाने मार्गच न काढता यंत्र खरेदीचा प्रस्ताव लालफितीत बांधून ठेवला. केवळ पाच कोटी रुपयांचे हे यंत्र महिनोंनमहिने निविदा प्रक्रियेत अडकून पडल्यानंतर त्यावर काढलेला मार्ग देखील निविदेचाच आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याबाबत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की जे. जे. सारख्या सरकारच्या प्रमुख रुग्णालयात दोन कॅथलॅब यंत्र बंद आहेत. या रुग्णालयात हृदयरोगावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. हाफकिन महामंडळाने ही निविदा प्रक्रिया वारंवार पाठपुरावा करूनही पूर्ण केलेली नसल्याने ती ‘डीपीडीसी’कडे आम्ही घेतली आहे. ‘हाफकिन’ने पैसे परत केल्यावर तातडीने निविदा काढून यंत्र खरेदी केली जाईल याकडे, मी स्वतः लक्ष देईन.

वर्षाला पाच हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया

ॲन्जिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात ५० ते ७० हजार आणि अॅन्जिओप्लॅस्टी स्टेननुसार खर्च होतो. हा खर्च किमान दोन लाख रुपयांपासून सुरु होतो. जे. जे. रुग्णालयामध्ये हे उपचार महात्मा गांधी जनआरोग्य योजनेत मोफत होते. त्याशिवाय अत्यंत माफक दरात उपचार केले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com