

Reel Star Shailesh Ramgude Arrested
ESakal
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. 15 - इन्स्टाग्रामवर मैत्री करून प्रेमसंबंधाचे नाटक रचून घरावर ईडीची धाड पडल्याची बनावट गोष्ट सांगत एका तरुणीला तब्बल 92 लाख 75 हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रीलस्टारला विष्णुनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश प्रकाश रामगुडे (वय 30) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो सोशल मीडियावर रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. यातून अनेक तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या.