रिलस्टारचा जीवघेणा थरार! सोशल मीडियावर व्ह्यूजसाठी धोकादायक चित्रीकरण; दहा गुन्हे दाखल, १० हजार ६०० रुपयांचा दंड

Mumbai Local Reelstar Stunt: सोशल मीडियावर व्ह्यूजसाठी रिलस्टारचा जीवघेणा थरार सुरू असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात दहा गुन्हे दाखल करत १० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Reelstar Stunt in Running Local Train

Reelstar Stunt in Running Local Train

ESakal

Updated on

मुंबई : दोन-चार सेकंदांच्या रीलसाठी जीव धोक्यात घालण्याची 'क्रेझ' रेल्वे परिसरातही पोहोचली आहे. सोशल मीडियावर व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी रेल्वे पूल, स्थानक परिसरापासून थेट धावत्या लोकलच्या दरवाजापर्यंत स्टंट केले जात आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अशा धोकादायक चित्रीकरण आणि स्टंटप्रकरणी आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी आठ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून १० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com