मुंबई अनलॉक बाबत BMC च्या अतिरिक्त आयुक्तांचं महत्त्वाचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mumbai

मुंबई अनलॉक बाबत BMC अतिरिक्त आयुक्तांचं महत्त्वाचं विधान

मुंबई: मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईचा रोजचा कोविड पॉझिटिव्हिटीचा रेट (covid positivity rate) ४.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्हिटीचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे लवकरच पूर्वीसारखं सर्व सुरळीत होण्याची (Mumbai normal life) अपेक्षा निर्माण झाली आहे. ३ एप्रिलला मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक २८ टक्के होता. त्यावेळी मुंबईत एकाच दिवशी ११, २०६ कोरोना रुग्ण आढळले होते. (Regarding mumbai unlock BMCs additional municipal commissioner Suresh Kakani important statment)

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालाय. पण मुंबई महानगर क्षेत्रातील अन्य शहरांचा पॉझिटिव्हिटी रेट ३.३ ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सध्या तरी आमचे वेट अँड वॉचचे धोरण आहे. "मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय. पण १ जून पासून निर्बंध सैल करण्याआधी अन्य महानगर प्रदेशातील पॉझिटिव्हिटी रेटही विचारात घ्यावा लागेल" असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी म्हणाले.

हेही वाचा: भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो'

महापालिका इतक्यात कोविड सेंटरही बंद करणार नाही. पुन्हा सर्व खुल करण्याआधी पॉझिटिव्हिटीचा रेट १४ दिवस पाच टक्के किंवा त्यापेक्षा खाली असला पाहिजे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने सरकारला दिला आहे. एक एप्रिलला मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट २०.८ टक्के होता. ३० एप्रिलला तो ९.९ टक्क्यापर्यंत कमी झाला. मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. पण पॉझिटिव्हिटी रेट वाढला नाही. तो १० टक्क्याच्या आत राहिला. मंगळवारी ५.३ टक्के तर बुधवारी ५.९ टक्के होता.

हेही वाचा: मुंबई: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या API ची पगारवाढ रोखली

MMR क्षेत्रातील अन्य शहरांमध्ये स्थिती सामान्य होत नाही, तो पर्यंत मुंबईला पूर्वीसारखं सामान्य होणं परवडणारं नाही, असं डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले. ते राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार आहेत. पालघरमध्ये पॉझिटिव्हिटी रेट १९.३ टक्के आहे. ठाण्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.४ टक्के आहे. पूर्वीसारखं जनजीवन सुरळीत होण्यासाठी मुंबई लगतच्या ठाणे, पालघर, वसई, विरार, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्येही पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे आवश्यक आहे.

loading image
go to top