सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आता ऑनलाइन

सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया यापुढे ऑनलाइन पार पडणार असून पीसीपीएनडीटीच्या वेबपोर्टलवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली
Registration of sonography centers is now online PCPNDT web portal mumbai
Registration of sonography centers is now online PCPNDT web portal mumbaisakal

मुंबई : सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया यापुढे ऑनलाइन पार पडणार असून पीसीपीएनडीटीच्या वेबपोर्टलवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्रधारकांना कार्यालयात हेलपाटे मारणे, अनावश्‍यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईतील कुपरेज येथील महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे लोकार्पण झाले.

ते म्हणाले, की राज्यात मुला-मुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य सरकार प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधात्मक कायद्याची (पीसीपीएनडीटी) काटेकोर अंमलबजावणी करत आहे. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी-नूतनीकरणासाठी आरोग्य विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलद्वारे नोंदणी/नूतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली जाणार आहे. आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य सुविधा पुरवणारी राज्यातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण टोपे यांच्या हस्ते मुंबईत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com