पुनर्वसनासाठी मच्छीमारांचे उपोषण सुरूच

पुनर्वसनासाठी मच्छीमारांचे उपोषण सुरूच
पुनर्वसनासाठी मच्छीमारांचे उपोषण सुरूच

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना सिडकोमार्फत पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, समुद्र, खाडीदेखील भूभाग म्हणूनच गृहीत धरून मच्छीमारांचेही पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मच्छीमार बांधवांनी १ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण अजूनही कायम आहे. 

अखिल किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची बैठक झाली. ही बैठक सुमारे तीन तास सुरू होती. या वेळी सिडको प्रशासनाकडून, संबंधित अध्यादेश काढण्यास वेळ मागण्यात आला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आल्याचे किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी सांगितले.
 
शिवडी- न्हावाशेवा सीलिंकच्या कामामुळे ३ वर्षे या ठिकाणी कधीच मासेमारी करू शकणार नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. एमएमआरडीएप्रमाणेच सिडको प्रशासनानेही नुकसानभरपाई द्यायला हवी. अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी केली आहे.

वाघिवली गावचे गव्हाण फाटा सेक्‍टर- २६ येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे; मात्र तेथील भूसंपादनाचे काम अजूनही झालेले नाही. गावातील बहुतांश लोकांचा मच्छीमारीचा व्यवसाय असल्याने उदरनिर्वाहाचाही प्रश्न आहे. 
- किरण केणी, पदाधिकारी, शिवक्रांती मावळा संघटना.

जलसमाधी घेणार
संध्याकाळी सहा ते साडे सात दरम्यान सिडको प्रशासनामार्फत झालेल्या बैठकीत मच्छीमार बांधवांच्या मागण्या मान्य करण्यात न आल्याने वाघिवली ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com