esakal | कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असून सर्व पातळीवरून सरकारला मदत करण्यात येत आहे. यात रिलायन्स फाउंडेशनने मोठा वाटा उचलला आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असून सर्व पातळीवरून सरकारला मदत करण्यात येत आहे. यात रिलायन्स फाउंडेशनने मोठा वाटा उचलला आहे. गरजूंना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी फाउंडेशनचे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी झटत आहेत. शहरात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने सर एन.एच. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालया (आरएफएच)तर्फे खाटांची संख्या ८७५ पर्यंत वाढविणार आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील लढ्यात राज्य सरकार आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने रिलायन्स चार महत्त्वपूर्ण उपक्रम राबविणार आहे. फाउंडेशनने कोरोना रुग्णांसाठी ८७५ खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये वरळीतील राष्ट्रीय स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील कोरोना केंद्रात ६५० खाटा, सेव्हन हिल्समध्ये १२५ तर ट्रायडंट हॉटेलमध्ये १०० खाटांची सोय केली आहे. १५ मे पासून १०० ‘आयसीयू’ खाटांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या ५५० खाटांच्‍या वॉर्डाचे व्यवस्थापन आणि कामकाज १ मे पासून ‘आरएफएच’ हाती घेणार आहे.

हेही वाचा: Phone Tapping Case: IPS रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचा समन्स

रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिव, दमण आणि नगर हवेली येथे दररोज ७०० टन प्राणवायू मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात आणखी विस्तार केला जात असल्याची माहितीही प्रवक्त्याने दिली.

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उपक्रमाची वैशिष्ट्ये
-‘आयसीयू’ खाटा, मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणे तसेच ६५० खाटांच्या व्यवस्थापनासाठी होणारा खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार
- ‘एनएससीआय’ आणि सेव्हन हिल्स येथे दाखल झालेल्या रूग्णांवर फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य उपचार
- डॉक्टर आणि परिचारकांसह फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे ५०० हून अधिक सदस्यांचे पथक रुग्णांना मदत करण्यासाठी २४ तास उपलब्ध असणार

loading image