Phone Tapping Case: IPS रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचा समन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

Phone Tapping Case: IPS रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचा समन्स

मुंबई: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. बदली प्रकरणाचा तपास करत असताना त्यांनी केलेल्या फोन टॅपिंगवरून बराच वादंग निर्माण झाला. त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे त्यांच्या निवासस्थानी आहेत. २८ एप्रिलला सायबर पोलिस त्यांचा जबाब नोंदवणार असून त्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय टेलिग्राफी एक्ट कलम 30, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 व 46 तसेच ऑफिशियल सिक्रेट एक्ट 05 या अंतर्गत रश्मी शुक्ला यांना जबाब नोंदवून घेण्याकरता मुंबई सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले आहे.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मात्र या प्रकरणासाठी बुधवारी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: रश्मी शुक्ला प्रकरण, अखेर 'मोठी' अपडेट आली समोर

फोन टॅपिंग प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण खूपच पेटलं होतं. या प्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याच्या तपासासाठी जबाब नोंदवण्याच्या उद्देशाने रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांचा जबाब सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त एन. के. जाधव यांच्यासमोर नोंदवला जाणार आहे.

Web Title: Ips Officer Rashmi Shukla Summoned By Mumbai Police In Phone Tapping

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top