esakal | लढा कोरोनाशी : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दोनदा पगार
sakal

बोलून बातमी शोधा

लढा कोरोनाशी : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दोनदा पगार

कोरोनासोबत लढण्यास रिलायन्स सरकारसोबत... 

लढा कोरोनाशी : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दोनदा पगार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूंचा देशात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आता सरकारसोबत रिलायन्स उद्योग समूहानेही मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच कोटींची मदत, सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये शंभर खाटांचे विलगीकरण, लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण कक्ष उभारून सरकारला सहकार्य करायचे ठरवले आहे.

सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने कोविडसाठी सकारात्मक चाचणी घेणाऱ्या रूग्णांसाठी मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 100 बेडवर एक विलगीकरण कक्ष सुरू करण्यास मदत केली आहे.

मोठी बातमी लहान मुलांना कोरोनाची माहिती कशी देणार? वाचा युनीसेफच्या टिप्स

रिलायन्सने रायगड जिल्ह्यातील लोधीवलीमध्ये रिलायन्सच्या रुग्णालयात पूर्णपणे सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार केले असून ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे. तसेच रिलायन्स लाइफ सायन्समध्ये प्रभावी चाचणीसाठी अतिरिक्त चाचणी किट आणि उपभोग्य वस्तूंची आयात करण्यात येणार आहे. 

रिलायन्सचे डॉक्‍टर आणि संशोधकही या प्राणघातक विषाणूचा इलाज शोधण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. रिलायन्सतर्फे दररोज दहा हजार फेस-मास्क तयार करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यात येत आहे. रिलायन्स कोविड-19 रूग्ण आणि विलगीकरण लोकांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांना मोफत इंधन पुरवणार आहे.

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

याव्यतिरिक्त, रिलायन्स फाऊंडेशन, सध्याच्या संकटात ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा विविध शहरांमधील लोकांना विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने मोफत अन्नाचे वाटप करणार आहे. 

महिन्यात दोन वेळा पगार 

रिलायन्स उद्योग समुहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी दरमहा 30 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी महिन्यात दोनदा पगार देण्यात येणार आहे, असे रिलायन्सतर्फे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

reliance industries stands with government against the fight of corona virus covid19 

loading image
go to top