रिलायन्स जिओ 31 मार्चपर्यंत फुकट 

पीटीआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई - रिलायन्स जिओचे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5.2 कोटी ग्राहक झाले असून, कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोफत कॉल आणि डेटा 31 मार्चपर्यंत देण्याची घोषणा गुरुवारी केली. 

मुकेश अंबानी म्हणाले, ""रिलायन्स जिओ देशातील सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. पहिल्या तीन महिन्यांत जिओ फेसबुक, व्हॉट्‌सऍप अथवा स्काईपपेक्षाही वेगाने वाढली आहे. जिओच्या प्रत्येक ग्राहकाला 4 डिसेंबर 2016 ते 31 मार्च 2017 पर्यंत डेटा, कॉल, व्हिडिओ आणि सर्व जिओ ऍप्लिकेशन मोफत मिळतील. सध्या सिम कार्ड वापरत असलेल्या ग्राहकांनाही "जिओ हॅप्पी न्यू इअर' योजनेचा फायदा मिळणार आहे.'' 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सप्टेंबरमध्ये मोफत कॉल आणि डेटा देण्याची घोषणा केल्याने भारतातील संपूर्ण दूरसंचार क्षेत्रात वादळ निर्माण झाले होते. डिसेंबरअखेरपर्यंत असलेली ही सुविधा आता पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिओचे ग्राहक सरासरी भारतीय ब्रॉडबॅंड वापरणाऱ्या ग्राहकापेक्षा 25 पट अधिक डेटा वापरत आहेत. मागील तीन महिन्यांत जिओचे दररोज 6 लाख नवीन ग्राहक झाले आहेत. 

सध्याच्या दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेला विरोध करणाऱ्या धोरणामुळे जिओच्या अत्युच्च तंत्रज्ञानाचे फायदे ग्राहकांना मिळत नाहीत. मात्र, नियामक यंत्रणांच्या मध्यस्थीमुळे कॉल ब्लॉक रेट 90 टक्‍क्‍यांवरून 20 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

- मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज

अंबानी म्हणाले... 

- जिओची सर्वाधिक वेगाने वाढ 

- फेसबुक, स्काईपला टाकले मागे 

- तीन महिन्यांत 5.2 कोटी ग्राहक 

- दररोज सरासरी 6 लाख ग्राहक 

- पंचवीस पट अधिक डेटा वापर

Web Title: Reliance Jio free March 31