सोडतीमध्ये अर्ज भरणाऱ्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई - म्हाडा सोडतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना दिलासा देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरण करत आहे. एका अनामत रकमेवर चार प्रवर्गामध्ये अर्ज भरण्यासह केवळ सोडत अर्जाची रक्कम घेण्याबाबतचा प्रस्ताव आगामी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रतीक्षा यादीतील प्रमाण वाढविण्याचा विचारही प्राधिकरण करत असून सोडतीमध्ये अर्ज भरू इच्छिणाऱ्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या एक हजार 384 घरांसाठी सोडत 16 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत अधिक पारदर्शक करण्यासाठी पाउले उचलण्यात आली असल्याने ही सोडत 100 टक्के यशस्वी पार पडेल, असा विश्‍वास शुक्रवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी व्यक्त केला. रविवारी काढण्यात येणाऱ्या सोडतीची प्रक्रिया सकाळी 7 ते सोडत पार पडेपर्यंत कोणताही अर्जदार पाहू शकतो. तसेच त्याबाबत कोणास शंका असल्यास त्याचे निरसन करण्यात येईल, असेही सामंत म्हणाले. 

सोडतीमधील अर्जदारांनी दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन सामंत यांनी केले आहे. त्याचप्रमाणे दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांमध्ये वाढ करण्याची आवश्‍यकता असून त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 

महाग घरांसाठीही मागणी 
म्हाडाने उच्चभ्रू वर्गांसाठी ग्रॅंट रोड येथील पाच कोटी 30 लाख रुपये किमतीच्या घरासाठी 130 जणांनी अर्ज केले आहेत. यामधील 39 अर्जदारांनी पैसे भरून सोडतीमधील प्रवेश निश्‍चित केला आहे. 

एक लाख 36 हजार अर्ज 
म्हाडा घरांच्या सोडतीसाठी 7 डिसेंबर सायंकाळपर्यंत एक लाख 36 हजार 233 इतके अर्ज आले आहेत. एक लाख 17 हजार 467 अर्जदारांनी नोंदणी केली आहे; तर अर्ज भरण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. 

Web Title: Relief for applicants in MHADA draws

टॅग्स