

mumbai local
esakal
- नितीन बिनेकर
मुंबई - पहाटेपासूनच फलाटावर सुरू होणारी धावपळ, गाडी येताच डब्यात शिरण्यासाठी होणारी चढाओढ, दोन - तीन लोकल सोडल्याशिवाय गाडीत चढता न येणे आणि दारात उभे राहून जीव मुठीत धरून करावा लागणारा प्रवास... मुख्य मार्गावरील कसारा पट्ट्यातील लाखो प्रवाशांच्या या रोजच्या संघर्षाला आता काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.