esakal | रेमडेसिव्हिर विक्रीचं आता 'सेलर्स मार्केट' झालंय!

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
  • महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देशापेक्षाही चांगला

  • ऑक्सिजन साठवण्यासाठी ऑक्सिजन स्टोरेज टँकर्स भाड्याने घेण्याची तयारी

  • नोंदणी केल्याशिवाय तरूणांनी लसीकरणाला येऊ नका

रेमडेसिव्हिर विक्रीचं आता 'सेलर्स मार्केट' झालंय!
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या रेमडेसिव्हिर (Remdesivir) औषधाचा तुटवडा आहे. रेमडेसिव्हिर तयार करणाऱ्या एकूण 7 कंपन्या आहेत. त्या कंपन्या ८५० ते ३२०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या किमतीला हे औषध विकत आहेत. सध्या रेमडेसिव्हिर खरेदीचा अधिकार केंद्राने स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. त्यांची या 7 कंपन्यांवर नजर आहे. कोणत्या राज्याला किती रेमडेसिव्हिर वाटायचे, यावर केंद्राचे लक्ष आहे. पण या विविध दरांमुळे रेमडेसिव्हिर विक्रीचे 'सेलर्स मार्केट' (Seller's Market) झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर नियंत्रण ठेवले पाहिजे", अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल आज राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. (Remdesivir has become Sellers Market Center should monitor Says Rajesh Tope)

हेही वाचा: मग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा - मनसे

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देशापेक्षाही चांगला!

"आज राज्यातील रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याचे दिसते. सहसचिव लव अग्रवाल यांनी 12 जिल्ह्यात घट होत आहे असे कळवलं आहे तर 24 जिल्ह्यात कोरोनो संख्या वाढत आहे. पण टेस्टिंग कुठेही कमी करण्यात आलेलं नाही. राज्याच्या टेस्टिंग मध्ये RT-PCR टेस्टींगचा रेट 65% आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट 84.7 टक्के इतका आहे आणि देशाचा रेट 81 टक्के आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षाही चांगला आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना

ऑक्सिजन साठवण्यासाठी ऑक्सिजन स्टोरेज टँकर्स भाड्याने घेण्याची तयारी!

"केंद्राने रेमडेसिव्हिरचा पुरवठा 9 मे पर्यंत करण्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने रेमडेसिव्हिर वाटप केले जाते. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात रेमडेसिव्हिर मिळत नाही, ही खंत आहे. ऑक्सिजन बचत करण्यासाठी ऑक्सिजन ऑडिट करत आहोत. हवेतून ऑक्सिजनचे 150 प्लँट तयार करत आहोत. तिसरी लाट येण्यापूर्वी आपल्याला नियंत्रण मिळवायचे आहे. ऑक्सिजन डॉक्टर किंवा ऑक्सिजन नर्स नेमण्याची सूचना आली आहे. ऑक्सिजन स्टोअर करण्यासाठी ऑक्सिजन स्टोरेज टँक भाड्याने घेण्याची तयारी आहे", असे टोपे म्हणाले.

हेही वाचा: मुंबईचे वाईट दिवस संपल्यात जमा

नोंदणी केल्याशिवाय तरूणांनी लसीकरणाला येऊ नका

"आपलं राज्य ग्लोबल टेंडर काढत 5 बाबी मागविणार आहे. मदत आणि पुर्नवसन सचिव खरेदी निर्णय घेत आहेत. टेंडरमधून साडेतीन लाखपर्यंत रेमडेसिव्हिर उपलब्ध होतील. 45 वयाच्या पुढील केवळ 25 हजार वॅक्सिन असल्याने केंद्र बंद ठेवावे लागले आहे. आता कोव्हिशिल्ड लसींचे 9 लाख वॅक्सिन आल्याची माहिती आहे, पण हे दोन दिवस पुरेल इतकेच आहे. 18 ते 44 वयातील नागरिक यांना 1 मे ला 3 लाख वॅक्सिन मिळाले. आता 18 लाख वॅक्सिनची ऑर्डर दिली आहे. कमी गतीने 18 ते 44 वयातील नागरिकांना लस देणे सुरू ठेवावे लागणार आहे. त्यामुळे नोंदणी केल्याशिवाय केंद्रावर कोणीही येऊ नये", असं त्यांनी सांगितलं.