हायड्रॉक्सीक्लोरिक्विन नंतर 'हे' औषध ठरू शकत गेम चेंजर; भारताचीही 'या' औषधावर आहे नजर

हायड्रॉक्सीक्लोरिक्विन नंतर 'हे' औषध ठरू शकत गेम चेंजर; भारताचीही 'या' औषधावर आहे नजर

मुंबई - जगभरातील कोरोनाचा प्रभाव पाहिजे तितका कमी होताना पाहायला मिळत नाही. अशात जगभरातून कोरोनावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देखील कोरोनावर कोरोनावर औषध शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करतंय. सध्या जगभरात कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये HIV साठी वापरात असणारं रेटोनावीर आणि लोपिनवीर तर मलेरियावरील हाइड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधांचा वापर करण्यात येतोय. अनेक देश यावर संशोधन करतायत. अशात आता आणखीन एका औषधाचं नाव समोर येतंय. ते औषध म्हणजे रेमडेसिवीर. मुख्य म्हणजे WHO देखील या औषधावर संशोधन करतंय. 

काय आहे रेमडेसिवीर औषध 

रेमडेसिवीर औषध हे अँटी व्हायरल औषध आहे. २०१४ मध्ये एका अमेरिकन कंपनीने हे औषध बनवलं होतं. हे औषध इबोला रुग्णांवर उपचार करण्यासाठी बनवण्यात आलं होतं.  याचसोबत सार्स आणि मार्स या रुग्णांवर देखील याचा उपयोग केला गेलेला. मार्स आणि सार्स हे व्हायरस देखील कोरोनाशी निगडित असे व्हायरस आहेत. अभ्यासकांच्या मते रेमडेसिवीर या औषधामुळे कोरोना व्हायरचा संसर्ग रोखला जाऊ शकतो.  

अभ्यासकांच्या मते कोरोना व्हायरस हा आपल्या शरीरातील पेशीमध्ये शिरकाव करतो. पेशींमध्ये गेल्यावर हा व्हायरस RdRP नामक एक एन्झाईम सोडतो. यामुळेच कोरोना आपल्या शरीरिरात पसरतो. मात्र अभ्यासकांच्या मते रेमडेसिवीर हे औषध व्हायरस मुळे सोडल्या जाणाऱ्या एन्झाईमचा स्त्राव रोखतं. या सोबतच हे औषध शरीरात कोरोना व्हायरसचा फैलाव देखील रोखते. म्हणूनच अभ्यासक या औषधाबाबत अधिक उत्साही आहेत. 

याबाबत एक रिपोर्ट आता समोर येतोय. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान आणि युरोपात हे औषध वापरलं गेलंय असं लिहिलण्यात आलंय. १० एप्रिलला प्रकाशित झालेल्या या रोपोर्टमध्ये एकूण ६१  कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आलं असं नमूद केलंय. हे सर्व रुग्ण गंभीर रित्या आजारी होते. या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल देखील कमी झालेली. या ६१ पैकी ५३ जणांचा अभ्यास करण्यात आलाय. या सर्वांना दहा दिवसांसाठी २०० मिलिग्रॅम औषढाचा डोस दिला गेला. यानंतर पुढील नऊ दिवस प्रत्येकी १००-१०० मिलिग्रॅमचा डोस दिला गेला. एकूण ५३ पैकी ३३ रुग्णांच्या ऑक्सिजनमध्ये वाढ पाहायला मिळाली. ३३ रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला, तर बाकीच्या १७ रुग्णांचे व्हेन्टिलेटर्स देखील काढून टाकण्यात आले. यापैकी सहा रुग्णांमध्ये हळू हळू तब्येतीत सुधार पाहायला मिळाला तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला.     

भारताचं काय आहे म्हणणं 

भारतात कोरोना रुग्णांवर कशा प्रकारे उपचार केले जावेत याबाबत ICMR मार्फत निर्णय घेतले जातात. ICMR च्या माहितीप्रमाणे भारतात सध्या हे औषध उपलब्ध नाही. हे औषध उपलब्ध झाल्यावर या औषधाचा वापर करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ICMR चे मुख्य संशोधक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या माहितीनुसार रेमडेसिवीर  हे औषध कोरोना व्हायरस जे एन्झाइम्स तयार करतात त्यावर काम करतं. आम्ही WHO कडून करण्यात येणाऱ्या चाचण्यांवर लक्ष ठेऊन आहो. सध्या भारतात हे औषध उपलब्ध नसल्याने आम्ही WHO च्या चाचण्यांवर आणि रिपोर्ट्सवर लक्ष ठेऊन आहोत. भारतात हे औषध कुणी बनवलं तर आम्ही यावर अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करू असं गंगाखेडकर म्हणालेत. 

remdesivir medicine may become game changer for the cure of covid 19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com