कल्याण : वाहनांच्या काळ्या काचा काढा; वाहतूक शाखेचे पालिकेस पत्र 

रविंद्र खरात 
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वाहनांच्या नोंदणी क्रमांकाव्यतिरिक्त वाहनांवर फॅन्सी नंबर काळ्या फिल्म लावू नये याबाबत अद्यादेश जारी करण्यात आला आहे. या धर्तीवर कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने कल्याण शहरात धडक कारवाई सुरू केली आहे. 

कल्याण : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वाहनांची नोंदणी क्रमांक व्यतिरिक्त वाहनांवर फॅन्सी नंबर काळ्या फिल्म लावू नये याबाबत अद्यादेश जारी करण्यात आला आहे. या धर्तीवर कल्याण वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई सुरू असून, तरी देखील महानगरपालिका अंतर्गत असलेले पालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या फिल्म लावत असल्याचे निर्दशनास येत असून, त्वरित ते काढून घ्यावे, अन्यथा रस्त्यावर ही वाहने आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करू असा इशारा कल्याण वाहतूक पोलिसांनी दिला आहे .

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वाहनांची नोंदणी क्रमांक व्यतिरिक्त वाहनांवर फॅन्सी नंबर काळ्या फिल्म लावू नये याबाबत अद्यादेश जारी करण्यात आला आहे. या धर्तीवर कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने कल्याण शहरात धडक कारवाई सुरू झाली असून अश्या वेळी महापौर, उपमहापौर, सचिव, सभापती, विरोधी पक्षनेते गटनेता, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांचे वाहन रस्त्यावर धावत असताना त्या वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या फिल्म असलेल्या वाहनाकडे बोट दाखवीत यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल सर्व सामान्य नागरिक करत आहे.

सुप्रीम कोर्टाचे आदेश संबधित पालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी त्वरित अंमलबजावणी करावी आणि त्वरित फॅन्सी नंबर आणि काळ्या काचा त्वरित काढावे, तसा अहवाल वाहतूक शाखेला द्यावा, शहरात कारवाई सुरू असून, कारवाई दरम्यान, वाहतूक पोलिसांशी वाद न करता वाहनांवर कारवाईला सहकार्य करावे असे आवाहन कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना एका पत्राद्वारे केले असून, आता पालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यावर अंमलबजावणी करणार का ? याकडे लक्ष्य लागले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the vehicle's black glass; Letter to the kalyan Municipality of the Transport Branch