मेंदी काढल्याने बालिकेला शाळेबाहेर काढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - भावाचे लग्न असल्याने हातावर मेंदी काढलेल्या मुलीला शाळेने घरी पाठवले. मेंदी पुसूनच शाळेत ये, असे तिला सांगण्यात आले. दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापिकेच्या या कृत्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्रसिद्धिमाध्यमांकडे हे प्रकरण जाणार असल्याचे कळल्यावर मात्र मुलीला शाळेत घेण्यात आले.

भावाच्या लग्नात मेंदी काढण्याचा या मुलीचा हट्ट आईने पुरवला खरा; पण सोमवारी (ता. 19) शाळेत पाठवल्यानंतर तिला परत घरी घेऊन जा, असे सांगणारा फोन आला. शाळेत मेंदीवर बंदी असल्याची पूर्वकल्पना होती; पण विद्यार्थ्यांना शाळेत घेतलेच जाणार नाही, असा कोणताही नियम पालकांना कळवण्यात आला नव्हता. प्रत्यक्ष भेटल्यानंतर "मुलीला दोन दिवस शाळेत आणू नका, नेलपॉलिश रिमूव्हरने मेंदी काढून टाका,' असा अजब सल्ला शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिल्याचे मुलीच्या आईने सांगितले.

या प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली असून ती काहीच खात नसल्याने आम्ही धास्तावलो आहोत. मंगळवारी तिला समजावून शाळेत पाठवले; परंतु पुन्हा तिला शाळेत घ्यायला नकार देण्यात आला. प्रसिद्धिमाध्यमांना आम्ही याची माहिती दिल्यानंतर मात्र मुलीला शाळेत येण्यास परवानगी मिळाली, अशी माहिती तिच्या आईने दिली. या प्रकरणी साने गुरुजी इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका बी. कमला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Removing a child is removed from academic support mehandi