
मुंबईत अटल सेतूवर शुक्रवारी पहाटे बीएमडब्ल्यू कारने डंपरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात २८ वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाने बीएमडब्ल्यू एक्स १ ही कार भाड्याने घेतली होती. तो पनवेलच्या दिशेने जात असताना पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली.