नेते, भाईंच्या पोस्टरला उत्तर म्हणून लावले कुत्र्याला शुभेच्छा देणारे पोस्टर

रविंद्र खरात 
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कल्याण : नेत्यांच्या आणि आता तर भाई आणि दादा, समाजसेवक लोकांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या कल्याण पूर्वकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर कल्याण पूर्व मधील नेतवली नाका परिसरात लावला असून हे पोस्टर दिवस भर सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरला आहे.

निवडणूक, सण, उत्सव, यात्रा असो वा नसो या काळात कल्याण पूर्वच्या गल्लो गल्ली नेते त्यांच्या कार्यकर्ते मंडळीचे पोस्टर असतात. मात्र नजीकच्या काळात नेत्यांसोबत भाई दादा लोकांना वाढदिवसाच्या पोस्टर आणि बॅनरमुळे कल्याण पूर्व मधील अनेक जण त्रस्त झाले आहेत , मात्र कुणाला बोलणार यामुळे त्यांनी शक्कल लढवीत आपला राग व्यक्त करत चक्क एका मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याच्या वाढदिवस शुभेच्छा देणारे पोस्टर कल्याण पूर्व मधील नेतवली नाका परिसरात लावल्याने एकचं चर्चा रंगली होती. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले.

मॅक्सभाईला जेष्ठ उद्योगपती टायसन भाई, युवा नेता डेंजर भाई, उद्योग पती प्रिन्सभाई, समाजसेवक मेरू भाई आदी शुभेच्छा देणारे असून नेते आणि भाई, दादा लोकांची चांगलीच खिल्ली उडवली असून कल्याण पूर्व मध्ये चर्चेचा विषय ठरला.

Web Title: reply to poster of leaders stands a posters of dogs