खुलासा झाला, मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू 'बर्ड फ्लू' मुळेच

खुलासा झाला, मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू 'बर्ड फ्लू' मुळेच

मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी व्यक्त केली.

मुंबई, ठाणे,दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात आले आहे. पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष पश्चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे यांचेकडे प्राप्त एकूण 66 नमुन्यांपैकी 22 अहवाल प्रलंबित असून 44 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कावळ्यांचे एकूण 9 नमुने पॉझिटिव्ह आले असून त्यात मुंबई, बीड, ठाणे, रत्नागिरी, नाशिक व नांदेड या जिल्हयांचा समावेश आहे.

कुक्कुट पक्षांमधील 8 नमुने होकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 13 नमुने नकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड, अकोला, अमरावती, अहमदनगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील एक नमुना नकारार्थी आढळून आला आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये 10 नमुने होकारार्थी आढळून आले असून त्यात परभणी, लातूर, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच गोंदिया, नागपूर, नाशिक, यवतमाळ व सातारा येथील नमुने नकारार्थी आढळून आले आहेत. 

अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी आणि पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. 
- अनुप कुमार , प्रधान सचिव , पशु संवर्धन विभाग 

राज्यात लातूर 47, गोंदिया 25, चंद्रपूर 86, नागपूर 110, यवतमाळ 10, सातारा 50, व रायगड जिल्ह्यात 3, अशी 331 मरतुक झालेली आहे. सांगली जिल्ह्यात 34, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात 1 बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये व वर्धा येथे 8 मोर अशा एकूण 44 पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 1, यवतमाळ 1, नंदुरबार 1, पुणे 2 व जळगाव जिल्ह्यात 2 अशा प्रकारे एकूण राज्यात 7 कावळ्यांमध्ये मरतुक आढळून आली आहे.

राज्यात 8 जानेवारीपर्यंत एकूण 3378 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुबा (ता. जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच 5 एन1 या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच 5 एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत. 

reports has come death of various crows in mumbai are due to bird flu

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com