गोरेगावमध्ये रिपब्लिकनचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

गोरेगाव - वाशिममधील मोठेगावातील संगीता मोरे या तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारण्यात आले. या प्रकरणातील सात आरोपींवर स्थानिक प्रशासन कारवाई करत नाही, असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे गोरेगाव विभागाचे अध्यक्ष रमेश पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजता निदर्शने करण्यात आली.

महिन्यापूर्वीच्या घटनेची प्रशासनाने दाखल घेतली नाही. सात आरोपी असतानाही केवळ एकाला पकडून प्रशासन हात झटकत आहे. संगीताच्या कुटुंबीयांना धमकाविले जात आहे. संगीता ६० ते ७० टक्के भाजलेली असतानाही तिच्यावर पूर्ण उपचार करण्याऐवजी तिला घरी सोडण्यात आले. या सर्व बाबी अनाकलनीय आहेत. त्यासाठीच आता सनदशीर मार्गाने सर्वत्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी मुंबई महिला आघाडी अध्यक्ष उषा रामलू, सलमान खान, प्रकाश लोखंडे, महादेव भालेराव, दगडू काळे यांच्यासह ६०० कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Republican movement in Goregaon