टीआरपीप्रकरणी रिपब्लिकच्या वितरण प्रमुखाला ठाण्यातून अटक; वाहिनीशी संबधित पहिलीच अटक

अनिश पाटील
Tuesday, 10 November 2020

टीआरपी गैरव्यवहारप्रकरणी ठाण्यातून रिपब्लिक टीव्हीच्या वितरण विभाग प्रमुखाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. घनश्‍याम सिंह असे या आरोपीचे नाव असून, त्याचा अटकेनंतर आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या 12 वर पोहचली आहे.

मुंबई : टीआरपी गैरव्यवहारप्रकरणी ठाण्यातून रिपब्लिक टीव्हीच्या वितरण विभाग प्रमुखाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. घनश्‍याम सिंह असे या आरोपीचे नाव असून, त्याचा अटकेनंतर आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या 12 वर पोहचली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रदुषण पुन्हा वाढले; कोविड रूग्णांनी ही खबरदारी घेण्याची गरज

रिपब्लिकशी संबंधित ही पहिलीच अटक असल्याने वाहिनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. टीआरपी गैरव्यवहारात यापूर्वी एकूण 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी थेट रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पहिलीच अटक झाली. आरोपीने यापुर्वी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलावडे याला वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. तर जानेवारी ते जुलै 2020 या सहा महिन्याच्या कालावधीत आरोपीने 15 लाख रुपये दिले. या प्रकरणात नुकतीच अटक झालेल्या आशिष अबिदुर चौधरी याच्या चौकशीतून ही बाब निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात थेट सहभाग दिसून आल्याने रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

जामीन मिळाला तरी अर्णब गोस्वामींना होऊ शकते पुन्हा अटक; पोलिसांनी नोंदवले डजनभर गुन्हे

घर, कार्यालयाची झाडाझडती 
टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोळावडे याने रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी लाखो रुपये दिल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक याच्या घराची आणि आशिष चौधरी याच्या पोखरण येथील कार्यालयामध्ये झाडाझडती घेतली होती. 

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic's distribution chief arrested in TRP case; The first arrest related to the channel