palghar nagar parishad
ESakal
मुंबई
पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण
Palghar News: पालघर जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये तीन नगराध्यक्षांच्या आरक्षणात अदलाबदली झाल्याचे समोर आले आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपरिषदांचे आणि तलासरी, विक्रमगड, मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. डहाणू नगरपरिषदेत सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण तर महत्वपूर्ण अशा पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.तलासरी, विक्रमगड, मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी म्हणून पडले आहे.

