esakal | ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..
sakal

बोलून बातमी शोधा

ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी मुंबई - ही बातमी म्हणजे कुठल्याही सिनेमाची स्क्रिप्ट नाही. ही बातमी म्हणजे १०० टक्के सत्य घटना आहे. बातमी वाचल्यावर अंधश्रद्धा आणि गुन्ह्यांचं कनेक्शन काय असतं याची कदाचित तुम्हाला प्रचिती येऊ शकेल आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न उपथित होतील. 

पनवेलमध्ये सोन्याचे गंठण चोरीला गेल्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणातुन पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणाऱ्या शारदाबाई गोविंद माळी या वृद्ध महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आमत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला आहे. मात्र शारदाबाईंच्या गळ्यावर जळाल्याच्या जखमा व त्यांचे केस जळाल्याचे आढळुन आल्याने शारदाबाई माळी यांना जाळण्याचा प्रयत्न करुन त्यांना गळफास देण्यात आल्याचा आरोप शारदाबाई यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शारदा माळी यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

मोठी बातमी - सावधान! नवी मुंबईत डोक्यावर पडतायत वीजेचे खांब..

ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल

या घटनेतील मृत शारदा माळी या पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात पती दोन मुले व सुन यांच्यासह रहाण्यास असून गेल्या 3 फेब्रुवारी त्यांनी 29 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बनवून घेतले होते. त्यानंतर सदरचे गंठण ते दाखवित असताना, रात्रीच्या सुमारास शेजारी रहाणाऱया अल्पवयीन मुलीने त्यांचे गंठण उचलून नेले. त्यामुळे शारदा माळी यांनी शेजारी राहणाऱ्या मुलगीची आई अलका पाटीलकडे गंठण बाबत विचारणा केल्याने त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. या भांडणात अलका पाटील हिने आपल्या मुलीचे नाव का घेता असे बोलून शारदाबाई माळी आणि तीचे पती गोविंद माळी यांच्याशी वाद घालुन भांडण काढले. तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अलकाचा पती गोपाळ पाटील व हनुमान पाटील या दोघांनी देखील शारदा माळी यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन त्यांना बघुन घेण्याची धमकी दिली. गोपाळ पाटील याने गावदेवीच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्याची सुचना केल्यानंतर रात्री सर्वजण गावदेवीच्या मंदिरात गेले. यावेळी ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल, अशी शपथ घेतली. त्यानंतर सर्वजण घरी परतले.

मोठी बातमी -  शरद पवारांचा मिडास टच, 'त्या' झोपडीचं पक्क्या घरात होणार रूपांतर

दुसऱ्या दिवशी काय घडलं ? 

दरम्यान, दुसऱ्या  दिवशी सकाळी पुन्हा शेजारी राहणाऱ्या अलका पाटील आणि वनाबाई दवणे या दोघींनी शारदा माळी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करुन शारदाबाई यांना विवस्त्र करुन मारण्याची धमकी दिली. तसेच देव तुला आज ठेवणार नाही,आजच्या आज घेऊन जाईल असे बोलून आरडा ओरड केली. या घटनेनंतर शारदा माळी यांच्या घरातील सर्व जण आपापल्या कामावर निघुन गेले. त्यानंतर दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शारदाबाई या आपल्या घरातील पहिल्या मजल्यावर संशयास्पदरित्या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आल्या. शारदाबाई यांच्या अंगावर साडी नसल्याचे, तसेच त्यांच्या गळ्यावर भाजल्याचे व त्यांचे केस जळाल्याचे आढळुन आले. तसेच त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आल्याचे आढळुन आले.

मोठी बातमी - महिला पोलिस उपनिरीक्षकास मोबाईलवर बोलणे महागात

पोलिसांची कारवाई : 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अलका पाटील, वनाबाई दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील आणि दागिने चोरल्याचा आरोप असलेली अल्पवयीन मुलगी या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र शारदाबाई पाटील या ज्या ठिकाणी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या, त्याठिकाणी त्यांच्या अंगावर साडी नसल्याचे तसेच त्यांचे केस, व गळ्यावर भाजल्याच्या जखमा आढळुन आल्या आहेत. त्यामुळे शारदाबाई यांना प्रथम जाळण्याचा प्रयत्न करुन नंतर त्यांना गळफास देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत शारदाबाई यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

मोठी बातमी -  एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले 7 कोटी

women from panvel takes extreme step after fight with neighbor cops thinks something fishy   

loading image
go to top