esakal | मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन हजारांवर जाऊ शकते - प्रवीण परदेशी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन हजारांवर जाऊ शकते - प्रवीण परदेशी

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक कोरोना टेस्ट केल्या जातायत. मुंबईत खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना टेस्ट केल्या जातायत. म्हणूनच मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा वाढलेला पाहायला मिळतोय. 

मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन हजारांवर जाऊ शकते - प्रवीण परदेशी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अशात मुंबईची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. येत्या तीन ते चार दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल साडे तीन हजारांवर गेलेला आपल्याला पाहायला मिळू शकते अशी शक्यता मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वर्तवलीये. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण परदेशी यांनी हा खुलासा केलाय. एका मराठी वृत्तवाहिनीने देखील याबाबत माहिती प्रदर्शित केलीये. 

मोठी बातमी - हा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर

मुंबईतीलील मोठी लोकसंख्या ही अत्यंत दाटी वाटीच्या भागांमध्ये राहते. यामध्ये धारावी सारख्या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीचा देखील समावेश आहे. अशात कोरोनाचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. याचसोबत भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक कोरोना टेस्ट केल्या जातायत. मुंबईत खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना टेस्ट केल्या जातायत. म्हणूनच मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा वाढलेला पाहायला मिळतोय. 

महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यन्त १२ हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्यात. दहा लाखांमागे मुंबईत तीनशे ते साडेतीनशे कोरोना टेस्ट करण्यात येतायत. ज्या देशामध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय अशा इटलीमध्ये एका लाखांमागे हजार बाराशे लोकांच्या टेस्ट केल्या जातायत हे गणित देखील पाहायला पाहिजे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन ते साडेतीन हजारांवर जाऊ शकते असं प्रवीण परदेशी म्हणालेत. 

मोठी बातमी - मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा...

कोरोनामुळे अर्धी मुंबई सध्या सील करण्यात आली आहे. अशात लॉकडाऊनमुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फायदा झालाय, असं परदेशी यांनी सांगितलंय. 

mumbai corona cases might increase upto 3500 in coming 3 to 4 days  

loading image
go to top